गोंदिया: शहरातील ग्रीन लँड लाॅन येथे अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 15, 2025 दि.15 सप्टेंबरला दु.12ते4 वाजेच्या दरम्यान ग्रीन लँड लॉन गोंदिया येथे जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा शाखा गोंदिया तर्फे अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या165व्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगुनाथम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्येने अभियंते उपस्थित होते