वैजापूर: बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी, माळीसागज येथील घटना
शेतात पाणी भरत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील माळीसागज येथे रविवार (ता.28) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.प्रथमेश अशोक डरे वय २४ वर्षे राहणार माळीसागज असे घटनेतील जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रथमेश हे रविवारी दुपारी शेतात पाणी भरत असताना अचानक मक्याच्या पिकातून बिबट्या आला आणि त्याने प्रथमेश यांच्यावर हल्ला केला परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्या तेथून पसार झाला.