दिंडोरी तालुक्यातील पालखेड–लोखंडेवाडी–जोपूळ–पिंपळगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून बाधित शेतकऱ्यांनी जोपूळ येथे आज 3 जानेवारी पासून बांधकाम विभागाच्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे .