'विश्वास विकासाचा, विजय भाजपाचा' हा नारा बुलंद करत भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास माजी खासदार सुनील मेंढे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी खासदार सुनील मेंढे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.