चंद्रपूर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक असून साधनसामुग्री व तांत्रिक सुविधांच्या सुि अभावामुळे शेतमाल पेरेपत्रकाची ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. शासनाने सातबारा उताऱ्यामध्ये शेतमालाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरू केली असली, तरी इंटरनेट सुविधा, संगणक अथवा स्मार्टफोनचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.