अंबरनाथ: बदलापूर मध्ये भरारी पथकाची कारवाई, तब्बल 'इतक्या' लाखाची रोकड जप्त,एकाला घेतले ताब्यात
बदलापूर मध्ये मतदानाच्या दिवशीच भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. सकाळच्या सुमारास बदलापूरमध्ये एका व्यक्तीला दोन लाखाच्या रोकड सह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया केली. मतदानाच्या दिवशी एका व्यक्तीकडे दोन लाखाची रोकड आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच सदरचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.