कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मतदार यादी मध्ये घोळ असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्या संदर्भात आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. तसेच याद्या दुरुस्त करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.