सुकळी या गावातील रहिवाशी रवींद्र गोवर्धन राठोड वय २९ हा शेत शिवारात गेला होता. दरम्यान त्याच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.