परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या थंडीमुळे पिंपरी शिवारातील धनंजय पांडव या शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीवर, झालेल्या विविध रोगाच्या आक्रमणामुळे तुरीचे पीक धोक्यात असल्याचे दिसत आहे. याबाबतीत आज दिनांक सात डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान शेतकरी धनंजय पांडव यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत परिसरातील शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे