अकोला: रंधा धबधब्यात तरुणाचा थरारक बचाव.प्रवरा नदीत जीवावर बेतलेलं साहस..
प्रवरा नदीवरील रंधा धबधब्याने आपली उच्चतम पातळी गाढली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा आला आहे. मात्र काही तरूण अशा गंभीर परिस्थितही याठिकाणी पोहायला येताना दिसत आहेत, अशातच एक तरुण वाहून जात होता. मात्र तो थोडक्यात बचावला. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावी अशी मागणी होत आहे.