महाड: महाड तालुक्यातील नाते येथे 75 वर्षीय महिलेच्या हत्येने खळबळ
Mahad, Raigad | Nov 30, 2025 महाड तालुक्यातील नाते येथे 75 वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केल्याच्या प्रकरणाने महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र उत्कृष्ट कामगिरी करीत पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावीत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी लीलावती बलकवडे आपल्या शेतातील वाड्यावर गेल्या असताना त्यांचा एकटेपणाचा फायदा घेत कोणा अज्ञात व्यक्तीने गळा दाबून हत्या करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच मोबाईल फोन घेत पळ काढला होता.