हिंगणघाट: गुरुनानक वार्ड,सिंदी कॉलनीत आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात गुरुनानक देवजी जयंती साजरी
हिंगणघाट शहरातील गुरुनानक वार्ड, सिंदी कॉलनी येथे गुरुनानक देवजींच्या ५५६ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शहरातील गुरुनानक वार्ड, सिंदी कॉलनी येथे मुख्य कार्यक्रम पार पडला, ज्यात मोठ्या संख्येने नागरिक,समाजसेवक, तरुण व महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली, ज्यामध्ये श्रद्धाळूंनी “वाहेगुरूजी का खालसा, वाहेगुरूजी की फतेह” या जयघोष केला.