मुंबई: 'महा निष्ठा,महा न्याय,महाराष्ट्र' या लालबाग येथील सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका
Mumbai, Mumbai City | Feb 17, 2024
युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या "महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र" च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात झंजावात सुरू आहे. शनिवार, (ता.१७) फेब्रुवारी रोजी मुंबईतील लालबाग विभाग क्रमांक ११ येथे आदित्य यांची तोफ धडाडली. या सभेला शिवसैनिक आणि मुंबईकरांनी मोठी गर्दी केली , संपूर्ण लालबाग शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. दरम्यान शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीका केली.