गोंडपिंपरी: वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या घरी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी भेट, केले कुटुंबीयांचे सांत्वन
गोंडपिपरी तालुक्यात नुकतेच आठ दिवसात चेकपिपरी येथील शेतकरी भाऊजी पाल व गणेशपिपरी येथील महिला अल्का पांडुरंग पेंदोर या दोन गरीब शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करण्यासह इतर मागण्यांसाठी वनविभागाच्या विरोधात नागरिकांनी गोंडपिपरी येथे एतीहासिक रस्ता रोको आंदोलन केले होते. (28 ऑक्टो) रोजी मृतकांच्या घरी जाऊन परिवाराची भेट घेऊन माहिती जाणून घेतली व गावकऱ्या सोबत चर्चा केली. वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाघाला त्वरित जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या.