पैठण: दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन लाखाची मदत
दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन लाखाची मदत वडवळी तालुका पैठण येथील पत्रकार सुरेश वायभट हे निमोनिया या आजाराने त्रस्त होते उपचारासाठी मोठा खर्च डॉक्टरांनी दाखवला होता दरम्यान पैठण तालुक्यातील पाचोड विहामांडवा आडुळ या गावातील पत्रकार बांधव व नागरिकांनी पुढे सरसावत सोशल मीडिया च्या माध्यमातून नागरिकांना मदतीची आव्हान केले होते दरम्यान नागरिकांनी माणुसकी दाखवत पत्रकार यांच्या उपचारासाठी आपापल्या परीने मदत दिली दुर्दैवाने या आजारात सदर पत्रकाराचा मृत्यू झाला