देवळी: आम्हाला मोबदला द्या!': शिरूड प्रकल्पाच्या पाण्याने शेती गिळंकृत केल्याने अल्लीपूरचे शेतकरी आक्रमक.
Deoli, Wardha | Oct 18, 2025 देवळी पुलगाव मतदार संघात येणाऱ्या शिरूड पाणीसाठा प्रकल्पाचे पाणी धोडरी शिवारात मोठ्या प्रमाणात शिरत असल्याने शेतीत मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अल्लीपूर परिसरातील शेतकऱ्यांचे पीक आणि जमीन पूर्णपणे बाधित झाली आहे.असे निवेदन पाटबंधारे विभाग वर्धा व उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग यांना देण्यात आल्याचे आज 18 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे