रामटेक: गडमंदिर रामटेक येथे काकड आरती सह दीपोत्सव साजरा; ढोल ताशा पथकाने उपस्थितांना रिझविले.
Ramtek, Nagpur | Oct 21, 2025 दीपावलीच्या पर्वावर रामटेक येथील प्रसिद्ध गड मंदिर परिसरातील राम-लक्ष्म मंदिरात मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबरला पहाटे चार वाजता पासून परंपरेनुसार काकड आरती करण्यात आली. यानंतर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. विविध संस्थांद्वारे अल्पपहार, मिठाई वितरित करण्यात आली. फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. तर रामराज्य ढोल ताशा पथकाद्वारे तब्बल तीन तास पर्यंत ढोल ताशा वादन करण्यात आले.