जळगाव: अमोदा खुर्द गावाजवळील हॉटेल जत्राजवळ झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भरधाव दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार ज्ञानेश्र्वर रतन पाटील (वय ४०, रा. आमोदा खुर्द, ता. जळगाव) याचा मृत्यू झाला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी अमोदा खुर्द गावाजवळील हॉटेल जत्राजवळ घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी ३वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे