जालना महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. गुरुवार दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर जालना महानगरपालिकेसाठी 15 डिसेंबर 2025 पासून निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आदीचे प्रतिनिधी उपस्थित होते.