रामटेक: कांद्री माईन्स जवळ पोलीस वाहतूक विभागाच्या वाहनाच्या धडकेत एका गाईचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Oct 22, 2025 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पोलीस स्टेशन रामटेक अंतर्गत येणाऱ्या कांद्री माईन्स परिसरात मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबरच्या सकाळी पोलीस वाहतूक विभागाच्या एका भरधाव वाहन क्रमांक एम एच 12 आर टी 95 56 ने एका गाईला जोरदार धडक दिली. यात गाईचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनाचा समोरचा भाग चकणाचूर झाला. माहितीप्रमाणे यावेळी गाय रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.