पाटोदा तालुक्यात वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकारांविरोधात आज स्थानिक नागरिकांनी जोरदार पद्धतीने आपला रोष व्यक्त केला. भ्रष्टाचाराविरोधात ठोस कारवाई व्हावी, प्रशासनाने दुर्लक्ष थांबवावे यासाठी तहसील कार्यालयासमोर अॅड. नरसिंह जाधव यांनी एकदिवसीय उपोषण सुरु केले. उपोषणादरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध शासकीय विभागांमध्ये वाढत चाललेल्या गैरव्यवहारांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. अनेक तक्रारी करूनही संबंधित अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.