कळमनूरी: आखाडा बाळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी माधवी पातुरकर यांची नियुक्ती
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी माधवी पातुरकर यांची हिंगोली महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे यांनी एका पत्राद्वारे नियुक्ती केली असून आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी आखाडा बाळापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जिल्हा सरचिटणीस बाबुराव वानखेडे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .