शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने झोपडी मोहल्ल्यात कारवाई करीत अवैध माेहफुलाची दारू विक्री करणाऱ्या एका युवकावर कारवाई केली. आरोपीकडून १५ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस हवालदार दिपक रहांगडाले यांच्या नेतृत्वाखालील पथक सहाय्यक फौजदार भाटीया, पोलीस शिपाई रावते, शेंडे, रहांगडाले यांनी २२ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असताना रात्री ८:४५ वाजता झोपडी मोहल्ल्यात प्रदीप उर्फ कालू राजू छुरा (२६) याच्या जवळून १५ लिटर मोहफु