कोपरगाव: शहरातील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीतील आरोपी विनोद पाटोळेचा मृत्यू
कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात सोमवारी 6 ऑक्टोबर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास न्यायालयीन कोठाडीतील आरोपी विनोद शिवाजी पाटोळे (वय 34, रा. समतानगर, कोपरगाव) मयत झाला आहे. पाटोळे याला सोमवारी संध्याकाळी कारागृहात चक्कर येऊन पडल्यानंतर त्याला कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत आज ७ ऑक्टोबर रोजी सकाळी माहिती देण्यात आली आहे,