जालना: जालना येथे साऊंड, लाईट आणि जनरेटर असोसिएशनची बैठक; व्यवसायावरील बंदी विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा
Jalna, Jalna | Sep 20, 2025 जालना येथील एका मंगल कार्यालयात शनिवार, दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता साऊंड, लाईट आणि जनरेटर असोसिएशनची बैठकीत पार पडली. यावेळी शासनाने घातलेल्या बंदीमुळे आलेल्या अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीला जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून शेकडो साऊंड, लाईट व जनरेटर व्यावसायिक, चालक व मालक उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांनी सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या रोजीरोटीवर आणि कुटुंबांवर होणार्या आर्थिक परिणामाची व्यथा मांडल्या. या उद्योगासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आहे.