गोंदिया भाजप कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चा च्या गोंदिया जिल्हा यांच्या वतीने जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष सिताताई रंहागडाले, ओम कटरे, माजी सभापती मनोज बोपचे, रवी पटले आदी उपस्थित होते. यावेळी गोंदिया जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष सीता रंहागडाले यांनी सर्वांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन केले.