कोरची: मुसळधार पावसामुळे नागरिकांचे घर झाले जमीनदोस्त.... कोरची येथील घटना
मागील दोन दिवसापासून सतत आलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही नागरिकांचे घर पावसामुळे कोसळून पडले आहेत. त्यामुळे काही नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहेत.अचानक झालेल्या या नुकसानीमुळे आता राहायचे तरी कुठे? असा प्रश्न या नागरिकांना पडलेला आहे.तातळीने पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.