आर्णी: शहरातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश;अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला कार्यक्रम
Arni, Yavatmal | Oct 28, 2025 आर्णी शहरातील काही कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्णीतील स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या