आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असताना शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात मात्र चित्र वेगळेच दिसत आहे. राजकीय रणधुमाळी सुरू असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या तृप्ती अजय सरोदे यांच्या व्यतिरिक्त कोणताही इच्छुक उमेदवार उघडपणे मैदानात उतरलेला दिसत नाही.