महाड: रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचा शतक महोत्सव उत्साहात संपन्न
Mahad, Raigad | Sep 14, 2025 अलिबाग येथे रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि. अलिबाग या प्रतिष्ठीत संस्थेचा शतक महोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात व उत्साहात आज रविवारी दुपारी ३ च्या सुमारास पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार मा. धैर्यशीलदादा पाटील व आमदार मा. संजयजी केळकर साहेब उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सुर्वे व संचालक मंडळाने मान्यवरांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. या प्रसंगी आजी-माजी शिक्षक वृंद तसेच पतपेढीचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले.