गडचिरोली: ठाणेगाव येथे भरदिवसा घरात हातपाय बांधून साडेतीन लाखांची चोरी करणाऱ्यांना अटक,
बालकासह तीन नवतरुणांचे कृत्य
घरात एकट्या राहणाऱ्या सेवानिवृत्त परिचारिकेचे हातपाय खुर्चीला बांधून ठेवून जबरीने साडेतीन लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना गेल्या 29 जुलै रोजी आरमोरीजवळच्या ठाणेगाव (नवीन) येथे भरदिवसा घडली होती. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलासह तीन नवतरुणांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह आरमोरी पोलिसांनी सात आगस्ट रोजी ही कारवाई केली.