देवस्थानांच्या मालमत्तेतील गैरव्यवहारावर कारवाईसाठी SIT नेमण्याची मागणी राज्यातील विविध देवस्थानांच्या मालमत्ता, जमीन, निधी आणि धार्मिक संपत्तीचा होत असलेला गैरवापर, अपहार आणि अनियमितता थांबविण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भातील सविस्तर निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य सरकारकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की— अनेक देवस्थानांमध्ये नॉन-ट्रान्सफरेबल मालमत्ता बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आल्याचे उघड झाले