आसेगाव फाट्यापासून दर्यापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जंगली प्राणी अचानक दुचाकीसमोर आडवा आल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आज सकाळी सुमारे ८ वाजता प्राप्त झाली. सदर अपघात काल रात्री घडला असल्याचे सांगण्यात येत असून, आज सकाळी ही घटना उघडकीस आली.या अपघातात विजय मदनराव वाठ वय ३९,या तरुणाचा मृत्यू झाला आहे.आज सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत एक व्यक्ती पडलेली असल्याचे ये-जा करणाऱ्या नागरिकांनाच्या निदर्शनात आली.