कळमेश्वर: दहेगाव ग्रामपंचायत रेशन कार्ड केवायसी च्या नावाखाली नागरिकांची लूट, शिवसेनेचे मंगेश गमे यांची घटनास्थळी धाव
कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत येथे रेशन कार्ड केवायसी करण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून 200 रुपये उकडण्याचा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र महामंडळ मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य आणि एफसीआय सदस्य असल्याचे भासवून एक व्यक्ती स्वतःला अनिल देशमुख या नावाने शासकीय अधिकारी म्हणून ओळख देत नागरिकांची फसवणूक करत होता.या प्रकाराची माहिती शिवसेना चे मंगेश गमे यांना मिळताच त्यांनी तात्काळ चौकशी केली