त्र्यंबकेश्वर: चालकाचा ताबा सुटल्याने कार गेली कश्यपी धरणाच्या पाण्यात , सुदैवाने जिवित हानी टळली कारचे मोठे नुकसान
गिरणारे ते हरसूल रस्त्यावर असलेल्या कश्यपी धरणाच्या पाण्यात रस्त्याने जात असलेल्या एका कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट धरणाच्या पाण्यात गेली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत कारमधील प्रवाशी बाहेर काढले. क्रेनच्या साह्याने कार बाहेर काढण्यात आली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.