दिग्रस: कोट्यवधींच्या फसवणुकीत दिग्रस पोलिसांची मोठी कारवाई, २ आरोपी जेरबंद, दोघांना ३ दिवसांची पोलिस कोठडी
दिग्रस शहरासह परिसरातील शिक्षक, कर्मचारी आणि नातेवाईकांना १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील केंद्रप्रमुख गिरीश किसनराव दुधे आणि त्याचा भाऊ शिक्षक विनोद किसनराव दुधे यांना दिग्रस पोलिसांनी ०६ जानेवारी रोजी अटक केली. ०६ जानेवारी रोजी दिग्रस न्यायालयात दोघांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून ०९ जानेवारीपर्यंत दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत.