भिवंडी: कशेळी पुलाखाली टवाळखोर तरुणांकडून भर दुपारी खुलेआम अमली पदार्थांचे सेवन, व्हिडिओ व्हायरल
ठाण्याकडून भिवडीकडे जाणाऱ्या नारकोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या कशेळी पुलाखाली काही टवाळखोर करून अमली पदार्थांचे सेवन करताना पाहायला मिळाले. भर दिवसा खुलेआमअमली पदार्थांचे सेवन करत असताना एका व्यक्तीने मोबाईल मध्ये हा प्रकार रेकॉर्ड केला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे,कारण व्यसनाच्या आहारी गेले की गुन्हेगारीचे मार्ग पत्करतात त्यामुळे योग्य वेळी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.