दारव्हा: शहरातील तहसील कार्यालयासमोर असलेल्या जागृत हनुमान मंदिरात शहरातील काकड दिंडींचा सत्कार
दारव्हा शहरातील जागृत हनुमान मंदिराच्या वतीने रविवारी पहाटे ६. ०० वाजता पासून काकड दिंडींचे स्वागत करून सत्कार करण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात यावर्षीही अनेक काकड दिंड्यांनी सहभाग नोंदवला. दिंडीतील भक्तांसाठी चहा व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक दिंडीचे शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.