गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखा युनिट दोन चे महेंद्र सडमाके यांनी वरिष्ठांना माहिती दिली की दाभा येथे प्रतिबंधित नायलॉन मांजा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून तब्बल 19 चक्री मांजा किंमत एकोणवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी आरोपी युगल लवाले व 19 वर्ष विरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे