वाशिम: छतावरील सौर पॅनलने घेतला पेट, सुदैवाने जिवीत हाणी नाही, सिंधी कॅम्प कारंजा येथील घटना
Washim, Washim | Oct 17, 2025 कारंजा शहरातील सिंधी कॅम्प परिसरात दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी जगमलानी यांच्या इमारतीच्या छतावरील सौर पॅनल प्रणालीला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट दिसून आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहाणी झाली नाही, मात्र सौर पॅनलचे मोठे नुकसान झाले.