मुर्तीजापूर: तहसीलदार यांच्या दालनात प्रगती शेतकरी मंडळासह विविध शेतकरी संघटना,अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन
संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे तालुका अतिवृष्टी मदत शासनाने जाहीर केली त्या यादीत मूर्तिजापुर तालुक्याचे नाव वगळण्यात आल्याने प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांच्यासह विविध शेतकरी संघटना,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,अतिवृष्टी पासून वंचित शेतकरी यांनी शनिवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पासून तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन मांडले असता उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी यादीमध्ये नाव जरी आज आले नसले तरी आमचा समावेश करण्यासाठी प्रयत्न चालू आहे