कोपरगाव: सुभाषनगर येथील उषाताई पवार यांची डीवायएसपीपदी निवड, आ.काळेंच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झालेल्या सुभाषनगर येथील उषाताई गंगाधर पवार यांची आज २ नोव्हेंबर रोजी आ.आशुतोष काळे यांनी सदिच्छा भेट घेतली व सत्कार केला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परिस्थिती कशीही असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे उषाताईंनी दाखवून दिलं आहे. आपल्या कष्टाने आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी पोलीस उपअधीक्षक पद गाठलं, हे सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचे ते म्हणाले.