अकोट हिवरखेड मार्गावरती करोडो रुपये खर्च करण्यात येऊन नवीन रस्ता बांधकाम सुरू असे दरम्यान या रस्ता बांधकामातील सुयोग्य दर्जाच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे या संदर्भात खंडाळा फाटा ते हिवरखेड मार्गादरम्यानच्या रस्ता कामाबाबत नागरिक हे रोष व्यक्त करताना दिसत असून खंडाळा येथील नागरिकांनी देखील या रस्त्याच्या कामातील दर्जाबाबत संबंधितांना जाब विचारून यातील दर्जा योग्यपणे न राखल्यास आंदोलनाचा इशारा देत वरिष्ठ पातळीवर पाठपुरा करणार असल्याचे सांगितले आहे.