चिखली: आमदार महाले यांनी धनाची पूजा करून निवासस्थानी कष्टकरी शेतकऱ्यांना नमन करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प
धनत्रयोदशीच्या पावन दिनी, मुंबई येथील निवासस्थानी आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी श्री धनाची पूजा करून आपल्या मातीतल्या कष्टकरी शेतकऱ्यांना नमन केलं.शेतकऱ्यांच्या हातून उगम पावलेलं प्रत्येक धान्य हे आपल्या जीवनाचं खरं धन आहे. त्यांच्या घामाच्या कणाकणातूनच आपल्या देशाची समृद्धी उभी आहे. विशेष दिवशी, आमदार महाले यांनी संकल्प केला की, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन.