कोपरगाव: दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी शहरातील गोकुळ नगरी परिसरात तरुणाची आत्महत्या
कोपरगाव शहरातील गोकुळ नगरी परिसरातील एका तरुणाने आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.आकाश आप्पासाहेब पाठक असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्यास प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले आहे.दरम्यान आकाश याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहे.