रामटेक: पवनी येथे उपविभागामार्फत आयोजित वन्यजीव सप्ताहातील चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन
Ramtek, Nagpur | Oct 6, 2025 नागपूर वन विभागाच्या रामटेक उपविभागामार्फत आयोजित वन्यजीव सप्ताहातील चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन आमदार आशिष जैस्वाल यांनी केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी नमूद केले की, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक डोळसपणे आणि परिणामकारकपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. मानव - वन्यजीव संघर्ष हा आपल्या भागात वाढत चाललेला अतिशय गंभीर आणि ज्वलंत प्रश्न असून, यावर प्रचंड प्रमाणात आणि वेळीच काम होणे गरजेचे आहे.