हिंगणघाट: शहरातील सुप्रसिद्ध जेष्ठ पत्रकार प्रदिप नागपुरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन:सर्वत्र शोककळा
हिंगणघाट शहरातील सुप्रसिद्ध जेष्ठ पत्रकार प्रदीप नागपूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या अशा अचानक निधनाने पत्रकार सामाजिक श्रेत्रात शोककळा पसरली आहे. अ. भा. स्तरावर स्वदेशी अभियानाचे कार्य हाती घेऊन भारतभर भ्रमंती करणारा एक चळवळीचा कर्मठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या हिंगणघाट शहरापासून सुरु झालेली त्यांची वाटचाल ही चक्क अ. भा. स्तरापर्यन्त कधी आणि कशी पोहचली हें कधी कोणालाच कळले नाही.