वाशिम: 'वंदे मातरम' सार्धशताब्दी निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात देशभक्तीचा जल्लोष
Washim, Washim | Nov 7, 2025 भारत माता आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या “वंदे मातरम” या अमर गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून “वंदे मातरम सार्धशताब्दी महोत्सव” उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने आज ७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामूहिक वंदे मातरम गायनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशभक्तीच्या भावना व्यक्त करत एकसुरात वंदे मातरमचे गायन केले.