समुद्रपूर: गिरड ,खुर्सापार परीसरात वाघांची दहशत :वनविभागाच्या वतीने २४ तास पेट्रोलिंग सुरू:नागरीकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
समुद्रपुर तालुक्यातील गिरड खुर्सापार शिवारात दिवसेंदिवस वाघाचा आतंक वाढतच चालला असून या वाघांनी वर्षभऱ्यात आतापर्यंत अनेक पाळीव जनावराचे प्राण घेतले आहे. रोज या वाघांचे शेत शिवारात शेतकऱ्यांना दर्शन होत आहे. वाघाच्या वाढत्या वावराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.यामुळे खबरदारी म्हणून वनविभागाच्या वतीने दोन पथक तैयार करण्यात आले असून २४ तास पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठिकठिकाणी ट्रॉप कॅमेरा बसविण्यात आले आहे.