चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात दोन बोकड व एक बकरी ठार, बोथली येथील घटना
बिबट्याच्या हल्ल्यात दोन बोकड व एक बकरी ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून ही घटना चंद्रपुरातील बोथली येथे घडली आहे.दरम्यान शेळी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच तात्काळ पंचनामा करण्यात आला आहे.